loader
Breaking News
Breaking News
Foto

काळबादेवीत माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सौर पथदिवे लोकार्पित

रत्नागिरी (जमीर खलफे) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील पाथरदेव बस स्टॉप आणि मयेकरवाडी येथे सौर पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते या सौर पथदिव्यांचा शुभारंभ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सौर पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रकाशाची सुविधा उपलब्ध होणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीनेही याचा फायदा होणार आहे. दरम्यान, काळबादेवी ग्रामस्थांच्या वतीने माजी खासदार विनायक राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख दत्ता कदम, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, माजी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, काळबादेवी शाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे, ओंकार वांगणकर, युवती विभाग अधिकारी दिव्या सुर्वे, प्रसाद सावंत, रशीदा गोदड, नितीन तळेकर, ज्येष्ठ शिवसैनिक बंड्या पेठकर, रंजीत मालगुंडकर यांच्यासह शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg