loader
Breaking News
Breaking News
Foto

करंजाळीतील शेतकरी प्रदिप पंदेरेंचा काजु बागेतील आंतर पिक फुल शेतीचा प्रयोग झाला सफल

दापोली (प्रतिनिधी) : कष्ट करण्याच्या उमेदीची मनात जिद्द असली की केलेल्या कष्ट आणि मेहनतीच्या यशाचे फळ मिळतेच मिळते. उपसलेले कष्ट आणि घेतलेली मेहनत अजिबातच वाया जात नाही. हे करंजाळी येथील शेतकरी प्रदिप पंदेरे यांनी आपल्या कृतीने प्रत्यक्षात दाखवून दिले आहे. अर्थाजन मिळवून देणा-या फुलशेतीच्या आंतर पिकाचा आदर्श शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरणार आहे. भाजीपाला, दुधदुभत, अंडी, बॉयलर कोंबड्या, फळ, फुले आदी विविध प्रकारचे सामान आणि वस्तू या विक्रीसाठी घाटमाथ्यावरुनच दापोलीत आणल्या जातात. त्यामुळे फळा-फुलांचे वा भाजीपाल्याचे आडते सांगतील त्या किंमतीच्या दराने त्यांना माल विकत घेऊन व्यवसाय करावा लागतो. त्यात भाजीपाला, फुले आदी माल हा नाशिवंत असतो त्यामुळे अशा आणलेल्या मालाची वेळेतच विक्री करावी लागते नाहीतर त्या व्यवसायात घाटा होतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याचा सारासार विचार करत कोकणच्या लाल तांबड्या मातीतील काळया दगडाच्या मातीत सोनं उगवण्याची क्षमता आहे फक्त त्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यात सातत्य ठेवणे गरजेचे असते, असा विचार करत दापोली तालुक्यातील करंजाळी येथील प्रदीप पंदेरे या शेतकर्‍याने आपल्या दोन एकर जमिनीतील काजू लागवडीच्या बागेत झेंडूच्या फुल शेतीबरोबरच हळद लागवड, भूईमूग लागवड, काळा भोपळा लागवड केली आहे. ही लागवड करण्यासाठी त्यांनी कोणत्याही कृषी अधिका-यांचे मार्गदर्शन घेतलेले नाही स्वतःहुनच हा प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला. श्रावण महिन्यातील सण उत्सव, भाद्रपद महिन्यात कोकणवाशीयांचा आवडता भक्तीभावाचा गौरी गणपतीचा सण उत्सव आणि अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव लक्षात घेऊन प्रदिप पंदेरे यांनी फुलशेती करण्याचा निश्चय केला आणि ते कामाला लागले त्यांनी श्रावण, भाद्रपद आणि अश्विन महिन्यातील सण उत्सव यांचे महत्व आणि त्या करिता देवादिकांच्या पुजेला लागणारी फुले याबाबतचे नियोजन करत त्यादृष्टीने पुर्णपणे नियोजन केले.

टाईम्स स्पेशल

श्रावण महिन्यात फुल काढणी सुरू झाली असून दर दोन दिवसाआड फुले काढून शंभर रुपये प्रती किलो दराने विकली जात आहेत. जागेवरच स्वच्छ, ताजी-टवटवीत आणि कमी दराने जागेवरच फुलांची विक्री होत असल्याने त्यांना बाजारपेठ शोधावी लागली नाही. तर ग्राहकांनाही ताजी फुले मिळत असल्याने फुलं विकत घेण्याचा ग्राहकांचा अधिक कल वाढला आहे. पंदेरेंनी आपल्या काजू बागेत झेंडू, हळद, भुईमूग आणि काळया भोपळ्याची लागवड चांगलीच तरारली आहे. सुरूवातीला येथील काहींनी पंदेरेंना वेडयात काढले होते. पंदेरेंचा आंतर पिकाचा प्रयोग यशस्वी होणार नाही असे, भाकीत वर्तवले होते. पंदेरेंची हेटाळणी केली होती. त्यातील अनेकजण फुलं विकत घेण्यासाठी पंदेरेंच्या दारात उभं राहून रांग लावत आहेत. हे पंदेरे यांच्या मेहनत आणि उत्तम नियोजनाचे फलित आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg