loader
Breaking News
Breaking News
Foto

रखडलेले दोन महिन्यांचे पगार दोन तासांत खात्यात जमा, सरपंच साळुंके यांच्या पुढाकाराचे कौतुक

खेड, कळंबणी (प्रतिनिधी) : ग्रुप ग्रामपंचायत कळंबणी बु. चे सरपंच भगवान दगडू साळुंके हे सरपंच झाल्यापासून गेली तीन वर्षे उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस करतात. रुग्णालय आवारात फिरत असताना तेथे कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या सफाई कामगारांनी सरपंचांकडे आपल्या व्यथा मांडल्या. सणासुदीच्या दिवसांत गेले दोन महिने आपला पगार झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. याबाबत सरपंच साळुंके यांनी कळंबणी रुग्णालयाचे अधीक्षक, जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन व संबंधित कंत्राटदार यांच्याकडे विनंती केली. मात्र, त्यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सरपंचांनी सर्व कर्मचार्‍यांना घेऊन शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या जामगे येथील निवासस्थानी भेट घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कामगारांच्या व्यथा ऐकून भाई कदम यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्यांच्या सूचनेनंतर दोन तासांच्या आत सर्व कामगारांचे रखडलेले पगार त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. सरपंच भगवान साळुंके यांना नुकताच महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला आहे. गोरगरीब कामगारांची व्यथा सोडवल्याबद्दल तालुक्यातून शिवसेना नेते रामदास भाई कदम यांचे कौतुक होत असून, कामगारांची व्यथा भाईंपर्यंत पोहोचवल्याबद्दल सरपंच भगवान साळुंके यांचेही कौतुक केले जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg