रत्नागिरी:संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथे गणेश विसर्जनादरम्यान एका तरुण लेकराचा बळी गेल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेजबाबदार कामामुळे सोनवी नदीपात्रात मृत्यूचे सापळे रचले गेले असून, याच खड्ड्यात बुडून प्रज्वल पुरुषोत्तम घडशी या तरुण मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डोळ्यांसमोर घडलेल्या या मानवी हत्येमुळे ग्रामस्थ आता अत्यंत आक्रमक झाले आहेत. शनिवारी दि.१९ रोजी सायंकाळी घडशी कुटुंब बाप्पाच्या विसर्जनासाठी सोनवी नदीपात्रात उतरले होते. वडील पुरुषोत्तम आणि मुलगा प्रज्वल दोघेही पाण्यात बुडाले. ग्रामस्थांनी धाव घेऊन वडील पुरुषोत्तम यांना कसेबसे वाचवले, परंतु प्रज्वलला मात्र काळाने हिरावून नेले. या घटनेनंतर ग्रामस्थांचा रोष उफाळून आला असून, हा कुठला अपघात नसून थेट ठेकेदाराच्या चुकीमुळे झालेला खूनच आहे, असा संतप्त आरोप केला जात आहे.प्रज्वल घडशीचे मृत्यू प्रकरण दडपण्यात आले तर माभळे परिसरातून संतापाची लाट उसळेल, ठेकेदाराने घडलेल्या खड्ड्यात निरपराध लेकराचा बळी बळी गेल्याची जनतेची भावना आहे .
स्थानिकांच्या मते, महामार्ग चौपदरीकरणाच्या भरावासाठी संबंधित ठेकेदाराने थेट गणेश विसर्जन घाटासमोरच तब्बल तीस फूट खोल खड्डा खोदून ठेवला होता. गाळ काढल्यानंतर नदीपात्राचे सपाटीकरण करणे बंधनकारक असतानाही ठेकेदाराने कमालीची निदर्शनास येणारी कसूर केली आणि नदीपात्रामध्ये मृत्यूचा सापळा तयार केला. विशेष म्हणजे, या धोकादायक खड्ड्यांबाबत ग्रामपंचायत, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी वारंवार संबंधितांना लेखी व तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र, ठेकेदाराने आणि संबंधित प्रशासनाने या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले, ज्याची किंमत आज एका निष्पाप तरुणाला आपला जीव देऊन चुकवावी लागली आहे.
केवळ कागदी घोडे न नाचवता संबंधित दोषी ठेकेदारावर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी, अशी आक्रमक मागणी आता संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, घडशी कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देऊन न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, सरपंच मनोहर जाधव, उपसरपंच सुरेश जोशी, बाळकृष्ण काष्टे यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी घेतली आहे. महामार्गाच्या कामामुळे आधीच गावाला जोडणारे रस्ते अपूर्ण आहेत आणि आता ठेकेदाराच्या चुकीमुळे तरुणाचा जीव गेल्याने ग्रामस्थांचा उद्रेक झाला आहे. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.