loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी-आतगाव परिसरात गौरी, गणपतींचे विसर्जन

केळशी (मंगेश पाटील): दापोली तालुक्यातील केळशी परिसरातील गौरी, गणपतींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर... असा जयघोष करीत भाविकांनी जड अंतःकरणाने गौरी, गरायाला भावपूर्ण निरोप दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गौरीचे तळे व केळशी समुद्र किनारी गौरी, गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. दुपारी ४ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत विसर्जन सुरु होते. केळशी परिसरातील गणेशोत्सवासाठी दापोली आडे पोलीस ठाणे येथील पोलीस श्री. राजू मोहिते व त्यांचे सहकारी तसेच पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी अधिक लक्ष देवून कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg