दापोली (प्रतिनिधी) : दापोली शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी नागरिकांवर अचानक हल्ले केल्याच्या घटनांमुळे स्थानिक जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दापोली शहर हे दापोली तालूक्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे दररोज या ना त्या कामानिमित्त दापोली शहरात दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील रहीवाशांचे येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच दापोली शहरातच कोकण कृषी विद्यापीठ आहे. दापोली शहरातुनच पर्यटक तालूक्यातील विविध ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर भटकंती करिता जात असतात त्यामुळे दापोली शहरात कायमच वर्दळ असते अशा या दापोलीत सध्या श्वानदंशाच्या (कुत्रा चावण्याच्या) घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
दापोली शहरातील काही रहिवासी हे आपल्या घरातील कचरा अन्न हे उघड्यावर टाकत असतात. त्यातच मटण-मासे विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकही उरलेले अन्न किंवा कचरा उघड्यावर टाकत असल्याने, त्या ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी गोळा होतात. दापोली शहरातील एस.टी. स्टॅड परिसर, मच्छि मार्केट, बाजारपेठ, केळसकर नाका, पोस्ट गल्ली, जोशी हाॅस्पिटल गल्ली, फॅमिली माळ, आझाद मैदान आदी अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. शहरात रात्रीच्या वेळी आणि पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांवर, तसेच दुचाकीस्वारांवर हे कुत्रे धावून जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
स्थानिक नगर पंचायत प्रशासनाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार कुत्र्यांचे निर्बीजीकरण (Sterilization) आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण योग्य गतीने होत नसल्याने कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याचा नाहक फटका शहरात या ना कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना सोसावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शहरातील नागरिकांना सुरक्षितपणे शहरात वावरण्यासाठी स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने दखल घेऊन कोणाही नागरिकांना, पर्यटकांना तसेच शहरात आलेल्यांना कुत्र्यांचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.










































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.