खेड - मंडणगड तालुक्यातील पणदेरी गावानजीक गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. १६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या असून, त्यानंतर १७ सप्टेंबरच्या पहाटे पोलिस ठाण्यात संबंधित गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. पहिली कारवाई १६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास पणदेरी गावानजीक रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. यावेळी साबर रजा अमिर बुरुणकर (वय ३०, रा. पणदेरी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) हा गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी पाहेकॉ. धनंजय शांताराम सावंत यांनी फिर्याद दिली असून, १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.४६ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ११५/२०२६ नुसार गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क) व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याच परिसरात रात्री सुमारे ९.१० वाजता दुसरी कारवाई करण्यात आली. पणदेरी गावानजीक नदीच्या बाजूला गांजा सेवन करताना तीन जण आढळून आल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. याप्रकरणी आदेश उदय तांबे (वय ३४), समिर विलास तांबे (वय २५, दोघेही रा. पेवे बौद्धवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) आणि आसिफ अ. समद ठोकण (वय ३०, रा. पणदेरी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोहेकॉ. तुकाराम खंडू पारधी यांनी फिर्याद दिली असून, १७ सप्टेंबर रोजी पहाटे १.०४ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ११६/२०२६ नुसार त्यांच्यावरही कलम ८(क) व २७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पणदेरी परिसरात अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने झालेल्या या दोन कारवायांमुळे अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात मंडणगड पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास मंडणगड पोलिसांकडून करण्यात येत आहे.










































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.