loader
Breaking News
Breaking News
Foto

गरजू मच्छीमारांना शेतकर्‍यांप्रमाणे शासकीय अनुदान मिळणार : अब्दुल बिजली खान

रत्नागिरी - पावसाळ्यात सुमारे अडीच महिने इतका प्रदीर्घ काळ समुद्रातील मच्छीमारीला बंदी असल्याने अनेक मच्छीमार बांधवांना उपासमार सोसावी लागते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी अशा गरजू मच्छिमारांना शेतकर्‍यांप्रमाणे २० ते २२ हजार रुपये देण्याचे नियोजन केले जात असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांनी सांगितले असून त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो मच्छीमारांना मोठा लाभ होणार असल्याचे भाजपाचे प्रदेश अल्पसंख्यांक उपाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी प्रतिपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष अब्दुल बिजली खान हे सदैव मच्छीमार बांधवांच्या हितासाठी कार्यरत असतात. त्यांनी सांगितले की, ‘‘जर दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली तर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान देण्यात येते. तशाच प्रकारे पावसाळ्यात सुमारे अडीच महिने समुद्रातील मच्छीमारी बंद असल्याने गोरगरीब मच्छीमारांची परवड होते. अशा वेळी त्यांना दिलासा देण्याकरीता गरजू मच्छीमारांना २० ते २५ हजार रुपये देण्याचे नियोजन केले जात असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांनी नुकतेच सांगितले’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

त्यांनी पुढे सांगितले, ‘‘महाराष्ट्राच्या किनार्‍यावर सुमारे ३,००० पेक्षाही अधिक मच्छीमारी नौका आहेत, त्यापैकी ४०० ते ५०० बिगर यांत्रिक नौका असून त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. यावर्षीही १ जून ते १५ ऑगस्ट अशी तब्बल अडीच महिने पावसाळ्यात समुद्रातील मच्छीमारी करण्यास बंदी होती. या काळात मच्छीमारांना उदरनिर्वाहाचे अन्य साधन नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली’’.‘‘त्यामुळे गरजू मच्छीमारांसाठी राज्य सरकारकडून हा दिलासा देणारा निर्णय घेण्याबाबत नियोजन आहे. गरजू मच्छीमारांना थेट २० ते २२ हजार रुपये अनुदान दिले जाईल व त्याचा संपूर्ण कोकणातील लाखो मच्छीमारांना फायदा मिळेल’’ असे प्रतिपादन अब्दुल बिजली खान यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg