मालवण (प्रतिनिधी) - 'स्वच्छता ही सेवा २०२६' अभियान तसेच International Coastal Cleanup Day 2026 निमित्त मालवण नगरपरिषदेच्या वतीने शनिवारी चिवला बीच येथे सागर किनारा स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या या अभियानाला नागरिकांसह विविध शासकीय विभाग, अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात नगरपरिषदेचे सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक सहभागी झाले.
याशिवाय मत्स्यविभाग कार्यालय, मालवण बंदर निरीक्षक कार्यालय, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (MMB) येथील अधिकारी व कर्मचारी तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनीही अभियानात सक्रिय सहभाग घेतला. अभियानादरम्यान चिवला बीच परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर आढळून आलेला प्लास्टिक कचरा, पिशव्या आणि अन्य घनकचरा मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आला. जमा करण्यात आलेल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली.
केवळ समुद्रकिनारा स्वच्छ करण्यापुरते मर्यादित न राहता या उपक्रमातून प्लास्टिकचा वापर कमी करणे, समुद्रात अथवा समुद्रकिनारी कचरा न टाकणे आणि सागरी पर्यावरणाचे संवर्धन करणे याबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्र येत राबविलेल्या या उपक्रमामुळे चिवला बीच परिसराला स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. 'स्वच्छ समुद्रकिनारा - सुंदर मालवण' या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मालवणच्या सागरी पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक सहभागाचे दर्शन या अभियानातून घडले.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.