मालवण : मालवण तालुक्यातील देवली कनकदेव वाडी येथील ओहोळावरील पुलावरून मोटरसायकल कोसळून झालेल्या भीषण अपघातात ओंकार भावा निकम (वय १२) आणि राजू अर्जुन निकम (वय १० ) दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. तर चालक सचिन अंकुश निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गोवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील पॉलिटेक्निक नजीकच्या कातकरी समाज वस्तीमध्ये राहणारे सचिन अंकुश निकम हे काल संध्याकाळी वाडीतील एका घरातील गणपतीचे दीड दिवसाचे विसर्जन करून झाल्यावर R15 (क्र. एम. एच. ०७ एव्ही ३६७३) या मोटरसायकलने देवली येथे काही कामानिमित्त जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्या सोबत ओंकार भावा निकम आणि राजू अर्जुन निकम ही दोन मुलेही होती. देवली येथील काम आटोपून रात्री हे तिघेही मोटरसायकलने कुंभारमाठच्या दिशेने परतत असताना देवली खालची येथील कनकदेव वाडी येथील ओहोळावरील पुलावर मोटरसायकल आली असता मोटरसायकल पुलावरून कोसळून खालील भागात फरफटत गेली. या भीषण अपघातात मोटरसायकलवरील ओंकार निकम व राजु निकम हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन निकम हे गंभीर जखमी झाले.
संध्याकाळी निघालेले हे तिघेही रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुंभारमाठ येथील त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान देवली येथे अपघातग्रस्त तिघेही दिसून आले. हे दृश्य पाहून तसेच दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी हंबरडा फोडला. याच वेळी त्या मार्गाने जात असलेल्या एका मोटरसायकलस्वाराने हा अपघात पाहून मालवण वायरी येथील माजी नगरसेवक आप्पा लुडबे, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांना माहिती दिली. माहिती मिळताचा आप्पा लुडबे, मंदार लुडबे, पियुष चव्हाण व इतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सचिन निकम यांना उपचारासाठी गोवा बांबूळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच तत्परतेने घटनास्थळी धाव घेत प्रो. डीवायएसपी शेलार, एपीआय गणेश माने, एपीआय पंडित पाटील, पीएसआय भगत, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर, कॉ. पाटील यांनी अपघाताची माहिती घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.