loader
Breaking News
Breaking News
Foto

हिवाळेत नदीत बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) - हिवाळे धुरीवाडी येथील देवकोंड परिसरात नदीत आंघोळीसाठी गेलेल्या यश अनंत धुरी (१८, रा. नालासोपारा, सध्या हिवाळे धुरीवाडी) या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. गणेशोत्सवासाठी गुरुवारी वडिलांसोबत तो गावी आला होता. शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता तो एका मित्रासोबत नदीत उतरला होता. पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे गेल्यानंतर तो भोवर्‍यात सापडून बुडाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर यशचा मृतदेह नदीतील गाळात आढळून आला. हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी शोधकार्यात सहभाग घेतला. आचरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. एपीआय संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत. मालवण तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशी बुडून मृत्यूची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg