loader
Breaking News
Breaking News
Foto

खराब व धोकादायक रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत गुहागरवासियांची मागणी

वरवेली (प्रतिनिधी) - गुहागर तालुक्यातील खराब व धोकादायक रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत गुहागरचे आमदार यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे गुहागर वासियांकडून ‘आपलं गुहागर’ या सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातील अनेक रस्त्यांची सध्याची अवस्था अत्यंत खराब झालेली असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे, रस्त्याचे खचलेले भाग, पावसाचे पाणी साचणे, रस्त्याच्या कडांची झालेली झीज तसेच आवश्यक ठिकाणी सुरक्षा सूचना व रिफ्लेक्टरचा अभाव दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या परिस्थितीमुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गांवर अपघात होण्याची शक्यता वाढली असून काही ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना नागरिकांकडून निदर्शनास आणून देण्यात येत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg