loader
Breaking News
Breaking News
Foto

शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीसांची चोख व्यवस्था

देवरुख( प्रतिनिधी) तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवरुख शहर व परिसरातील देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदाच्या गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींची विधीवत स्थापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.थोडक्यात देवरुख परिसरात विविध गावांमध्ये गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत बाप्पाचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवरुख पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.देवरुख शहरात वाहतूक कोंडी होवू नये म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी चोख वाहतूक व्यवस्था केलेने गणेशभक्तांचा वाहतुकीचा खोळंबा झाला नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेशभक्तांनी शहरात वाहतूक कोंडी होवू नये म्हणून यासाठी चाकरमान्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.गणेशोत्सव काळात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने वाहतूक व्यवस्था, ध्वनिप्रदूषण तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने देवरुख पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg