loader
Breaking News
Breaking News
Foto

आळंदी येथे २७ सप्टेंबर रोजी पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान पुणे तृतीय वर्धापन दिनानिमित्त भव्य नाम यज्ञ सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान पुणे तृतीय वर्धापन दिनानिमित्त भव्य नाम यज्ञ सोहळा रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी गुरु गजानन, मंगल कार्यालय, चाकण चौक, आळंदी देवाची पुणे येथे माऊलीच्या संजीवन समाधीच्या पवित्र सानिध्यात, पावन इंद्रायणी मातेच्या तीरावर एक दिवसीय भव्य नाम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाम यज्ञ सोहळ्यासाठी सर्व साधक व परिवार जणांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नाव नोंदणीसाठी चारुशीला गुल्हाने मोबाईल नं.९८९८५८२६४४ येथे संपर्क करावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पहाटे ५.३० वा.काकडा आरती व भजन, सकाळी ७ वा.माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन, सकाळी ८ वा.निवडक ज्ञानेश्वरीचे वाचन, सकाळी ९ वा.वीणा, प्रतिमा पूजन औपचारिक उद्घाटन व गुरुवर्याचे मार्गदर्शन, सकाळी १० वा.प्रवचन ह.भ.प. एकनाथ महाराज मोरे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज कदम, सकाळी ११ वा. कीर्तन, ह.भ.प. प्रविण महाराज मुळे, दुपारी १ वा.भोजन व विश्रांती, दुपारी ३ वा. प्रवचन ह.भ.प. श्रीमती चारुशीला ताई गुल्हाने श्रीमती छाया ताई चव्हाण,सायंकाळी ४ वा.हरिपाठ, सायंकाळी ५ वा. कीर्तन, ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार ह.भ.प. शंकर महाराज मोरे यांचे कीर्तन, सायंकाळी ७ वा.सांगता कार्यक्रम होईल.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून ह.भ.प.श्रीराम महाराज भोमे, ह.भ.प.प्रकाश महाराज सोलकर, ह.भ.प.रंगनाथ महाराज नाईकडे, ह.भ.प.अर्चित महाराज चक्रांकित, ह.भ.प.गायत्री देशमुख, ह.भ.प.संगीता इनामदार असणार आहेत. तरी या भव्य नाम यज्ञ सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष पांडुरंग महाराज पांगारे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg