loader
Breaking News
Breaking News
Foto

सरंद खालचीवाडी गणपती विसर्जन घाट उदघाटन सोहळा संपन्न

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील सरंद खालचीवाडी येथील श्री गणपती विसर्जन घाट उदघाटन नुकतेच अनेक मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले. धामापूर तर्फे संगमेश्वर गटाचे विद्यमान जि.प. सदस्य सुशील भायजे यांच्या शुभहस्ते उदघाटन स़ोहळा पार पडलेल्या विसर्जन घाटासाठी चिपळूण संगमेश्वरचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून कोयना भूकंप १५ लाख निधी मंजूरीने प्राप्त झाला असून आमदार शेखर निकम यांनी येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द एका वर्षात पूर्ण केला आहे. ही वचनपूर्ती पूर्ण केल्याने येथील ग्रामस्थांनी आमदार निकम यांचे मनस्वी आभार व्यक्त करून धन्यवाद दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या अनेक वर्ष्यांची या गणपती विसर्जन घाटाची ग्रामस्थांची मागणी होती. गणपती विसर्जनाच्या वेळी मूर्ती व्यवस्थित ठेवून लोकांनाही नीट उभे राहता यावे. यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत होते. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य दीपक जाधव, माजी पं.स.सदस्य नाना कांगणे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष गणपत चव्हाण, सरंदच्या सरपंचा जाधव, आंबव चे सरपंच शेखर उकर्डे, तुकाराम मेस्त्री, संतोष सुवरे, संजय सुवरे, विलास सुवरे, देवदास जड्यार, विशाल पवार, मंगेश पवार, दीपक पवार, विजय पवार, रमेश पवार, बिपीन महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg