loader
Breaking News
Breaking News
Foto

माणगाव वाहतूक पोलिसांकडून दुबईचे उद्योजक बशीर भाई हजवानी यांचा सत्कार

खेड (प्रतिनिधी) : माणगाव वाहतूक पोलीस चौकी येथे एक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. JMBR ग्रुप ऑफ कंपनीजचे एमडी आणि बशीर हजवानी फाउंडेशनचे अध्यक्ष बशीर एम. हजवानी यांचे माणगाव वाहतूक पोलीस विभागातर्फे जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांसाठी फाउंडेशनने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता म्हणून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणपती उत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे वाहतूक नियंत्रणासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या पोलीस बांधवांच्या जेवणाची, राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था बशीर हजवानी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. त्याच सेवाभावाची दखल घेत हजवानी यांनी वाहतूक पोलीस चौकीला भेट दिली असता, संपूर्ण वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानून त्यांचा सन्मान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg