loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीत गणेशमूर्तींची उत्साहात स्थापना

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदाच्या गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींची विधीवत स्थापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती आणि सार्वजनिक मिळून एकूण १३,५४४ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विविध गावांमध्ये गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत गणरायाचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेशभक्तांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने वाहतूक व्यवस्था, ध्वनिप्रदूषण तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg