loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत हळव्या नाचणी वाणाचं पिक पसवलं

दापोली (प्रतिनिधी) - नाचणी हे एक अत्यंत पौष्टिक आणि कमी पाण्यात येणारे खरीप हंगामातील महत्त्वाचे भरड धान्य आहे. अशा या नाचणी पिकाची चांगली वाढ झाल्याने यावर्षी गणपतीतच नाचणी पसवली आहे. नाचणी लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि ५.५ ते ८.५ सामू (कि) असणारी जमीन योग्य असते. प्रामुख्याने मान्सूनवर आधारित, उष्ण व दमट हवामान या पिकासाठी उत्तम मानले जाते. डोंगर उतारावर किंवा वरकस जमिनीतही हे पीक चांगले वाढते. नाचणी प्रामुख्याने खरीप हंगामात घेतली जाते. जून ते जुलै दरम्यान या पिकाची पेरणी किंवा रोपांची लागवड केली जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम घाटात याची मोठ्या प्रमाणावर शेती होते. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह (आयर्न) आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. नाचणी मधुमेह आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यापासून भाकरी, आंबील, नाचणी सत्त्व, पापड आणि विविध पौष्टिक पदार्थ बनवले जातात. तसेच जनावरांसाठी उत्तम सकस चारा मिळतो. आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेले नाचणी हे एक महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे हाडे आणि दात बळकट होतात. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यात तंतुमय (फायबर) घटक चांगल्या प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठता टाळता येते आणि पचनक्रिया सुधारते.

टाईम्स स्पेशल

नाचणी लोह (आयर्न) चा उत्तम स्त्रोत असल्याने रक्तातील लाल पेशी वाढवण्यास आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत करते. नाचणीचे सेवन केल्यावर पोट दीर्घकाळ भरल्यासारखे राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. नाचणी हे पीक कमी पाण्यात आणि खडकाळ जमिनीतही तग धरू शकते, त्यामुळे हवामान बदलाच्या काळात वरदान ठरते, असे हे पिक दापोलीत सर्वत्र पसवण्यास चांगलीच सुरूवात झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg