सावर्डे (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथील भागीरथीबाई राजेशिर्के सभागृह (विसावा मंगल कार्यालय) येथे श्री सुकाई शिरकाई संस्था, कुटरे आणि राजेशिर्के परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘इटुकली पिटुकली स्पर्धा २०२६’ मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेला माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. लहान मुलांच्या निरागसतेला, सृजनशीलतेला आणि सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटातील बालकांनी अनेक मनोरंजक स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपल्या कला, आत्मविश्वास आणि कौशल्यांचे दर्शन घडविले. स्पर्धेदरम्यान उपस्थित पालक, मान्यवर आणि नागरिकांनी चिमुकल्यांच्या सादरीकरणांना उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी उपस्थित बालकांशी संवाद साधताना सौ. पूजा निकम यांनी मुलांना प्रोत्साहन दिले. त्या म्हणाल्या, “बालपणातील कला, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ‘इटुकली पिटुकली स्पर्धा’ ही संकल्पना नाविन्यपूर्ण असून मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाच्या यशाची खरी पावती आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत राहील.” स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकासह विविध पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व बालकांचेही कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान चिमुकल्यांचा उत्साह, खेळकरपणा आणि निरागस भाव पाहून उपस्थित पालकही भारावून गेले.
‘इटुकली पिटुकली स्पर्धा’ हा केवळ स्पर्धात्मक उपक्रम न ठरता बालकांच्या आनंदाला, आत्मविश्वासाला आणि सर्वांगीण विकासाला चालना देणारा संस्मरणीय सोहळा ठरला. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी सौ. स्मिता राजेशिर्के, सुनीता राजेशिर्के, स्मिता दळवी, प्रकाश राजेशिर्के, सई सुर्वे, राजेंद्र मते, सागर राजेशिर्के, श्री. घडशी यांच्यासह अनेक मान्यवर, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.