वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पालशेत-निवोशी ग्रामपंचायत हद्दीतील जोईलवाडी येथे गेले आठ दिवस ग्रामपंचायतीचा नळ पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पाणी बंद झाल्याने सणाच्या आनंदाला गालबोट लागले असून, मुंबई-पुण्याहून सणासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर समस्येबाबत जोईलवाडी ग्रामस्थ मंडळाने मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत पालशेत-निवोशी कार्यालयात सरपंच/ ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन पाणी पुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आठ दिवसांपासून नळाला पाणीच येत नाही आणि ग्रामपंचायतीकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे विशेषतः महिला वर्गाला मैलो दूर पायी जाऊन डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.
ग्रामस्थांच्या संतापाचे दुसरे कारण म्हणजे याच वर्षापासून ग्रामपंचायतीने पाणीपट्टीत मोठी वाढ केली आहे. नागरिक वेळेवर कर भरायला तयार असताना, ऐन सणासुदीला पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत गरजच भागत नसेल तर वाढीव पाणीपट्टीचा अर्थ काय? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या कारभाराविरोधात महिला वर्गात तीव्र नाराजी असून, प्रशासनाचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे. ही संवेदनशील समस्या तातडीने मार्गी लावून पर्यायी व्यवस्था उपलब्ध कराव्यात अशी मागणी होत आहे. या तक्रारीनंतर प्रशासन काय दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.