loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पारिजात कांबळे यांच्या प्रचारासाठी बळीराज सेनेच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पारिजात कांबळे यांच्या प्रचारासाठी बळीराज सेनेच्या वतीने गुहागर शहरातील वाडी वस्त्यांवर तसेच बाजारपेठ मध्ये प्रचार सुरू असून त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पारिजात कांबळे यांच्या प्रचाराची पत्रके घरोघरी वाटली जात आहेत. जनतेकडून सुद्धा पारिजात कांबळे यांना पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बळीराज सेनेचे युवा कार्यकर्ते अशोक मोहिते, बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, बळीराज सेनेचे गुहागर तालुकाध्यक्ष अरुण भुवड, विजय मोहिते, संदेश कातळकर, विवेक जांगली, अशोक रावणग, मनोहर घुमे, ऐश्वर्या कातकर, श्रावणी शिंदे नीता शिगवण, साक्षी कातकर, सोनाली महाडे, अरुण भागडे, कोमल कांबळे आधी कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg