loader
Breaking News
Breaking News
Foto

गणपती उत्सावापूर्वी साखरपा-देवडे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा - सागर तांदळे

देवळे (प्रकाश चाळके) - तालुक्यातील साखरपा-देवडे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याला अनेक ठिकाणी खड्यांचे ग्रहण लागले आहे. डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. हा मार्ग परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा असल्याने रस्त्यावरून प्रवास करताना खड्डे चुकवून रस्ता शोधावा लागतो. या रस्त्याचे खड्डे गणपतीपूर्वी भरुन व्हावेत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख येथे पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे यांनी निवेदन दिले आहे. साखरपा ते देवळे मार्गांवरील सर्व नागरिकांची साखरपा ही मुख्य बाजारपेठेत असल्याने त्यांना या बाजार पेठेवरच अवलंबून रहावे लागते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खड्यामुळे लहान गाड्या घसरून अपघात झाल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे रुग्णवाहिका जाण्यास व येण्यास विलंब होतो. रस्त्याच्या कडेला असणारी झाडी वाहनधारकांना अडचणीचे होत असून दोन्ही बाजूने वाहने आल्यास व साईडपट्टीला काटाळी पडल्याने वाहने पास करण्यास अत्यंत्य जिकरीचे बनले आहे. त्यातच गणेशउत्सव काही दिवसांवर आल्याने रस्त्याची डागडुजी करुन खड्डे डांबर खडीने तातडीने भरण्याची मागणी पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख (संगमेश्वर) यांच्याकडे केली असून त्यासंबंधी त्यांना लेखी पत्र दिले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg