loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशनतर्फे सावंतवाडीत ज्युनिअर खेळाडूंना कॅरमचे खास प्रशिक्षण

सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशनच्या वतीने सावंतवाडी येथील भरत कॅरम अकॅडमी येथे ज्युनिअर खेळाडूंसाठी कॅरम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी हे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.​ प्रशिक्षक योगेश फणसळकर हे या शिबिरात खेळाडूंना मार्गदर्शन करतील. प्रशिक्षण वर्ग दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहेत. ​या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना योगेश फणसळकर यांनी सांगितले की, जर इच्छुक खेळाडूंची संख्या वाढली तर रविवारी प्रशिक्षणासाठी जादा वेळ दिला जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे अधिकाधिक ज्युनिअर खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. ​इच्छुक कॅरम खेळाडूंनी अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा: ​भरत कॅरम अकॅडमी मोबाईल नंबर: 9420646945 ​या उपक्रमामुळे सावंतवाडीतील कॅरम खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रवासात नक्कीच मोठा फायदा होईल, असे भरत सावंत यांनी म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg