loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर शहराचा पायाभूत सुविधा निर्माण करून पर्यटन दृष्ट्या विकास करणार - सुजाता बागकर

वरवेली (गणेश किर्वे) - रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार व आमचे नेते सुनील तटकरे यांच्या माध्यमातून व प्रयत्नातून गुहागर शहरासाठी ४५ कोटी रुपयांची नळपाणी योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून त्याचा आम्ही सर्वजण पाठपुरावा करत आहोत. या नव्याने होणाऱ्या नळ पाणी योजनेतून गुहागर शहराला २४ तास पाणी देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. पुढील २५ वर्षातील लोकसंख्येचा दृष्टिकोन लक्षात घेऊन ही योजना मला यशस्वीपणे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता श्रीधर बागकर यांनी सांगितले. त्यानी पुढे सांगितले की,गुहागर नगरपंचायत मध्ये नगरसेवक म्हणून गेली दहा वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. मला शासनाच्या विविध योजनांची माहिती आहे. शहरातील नागरिकांशी विविध शासनाच्या योजनेच्या माध्यमातून माझा नेहमी संपर्क राहिलेला आहे.परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये गुहागर शहराचा विकास जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा होऊ शकला नाही ही खंत व्यक्त करून गुहागर शहराचा पर्यटन दृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करून गुहागर शहर जगाच्या पर्यटन नकाशावर कसा झळकेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी अनेक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. गुहागर शहरामध्ये पार्किंगची योग्य व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. पर्यटन दृष्ट्या गुहागर बीच जग भरातून आलेल्या पर्यटकांना शोभेल असा सुंदर बनवून तेथील शासकीय जागा आपल्याकडे घेऊन भाडेतत्त्वावर त्या ठिकाणी महिला बचत गट व नागरिकांना चांगले दर्जेदार स्टॉल उभे करून त्या ठिकाणी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे. येथील प्राचीन मंदिरे त्याचप्रमाणे सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात त्यांच्यासाठी समुद्रकिनारी व संपूर्ण शहरामध्ये स्ट्रीट लाईट व्यवस्था, पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था चांगली करण्यासाठी माझा जास्त भर असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५ उमेदवार नगरसेवक पदासाठी व मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभी असून आम्ही सर्वजण नक्कीच निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

निवडून आल्यानंतर युतीमध्ये जाणार की स्वतंत्र राहणार त्याचा निर्णय पुढे घेऊ. युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीता मालप यांच्यामध्येच माझी लढत होईल. तरीसुद्धा मी निवडून आली तरी आनंद. ती निवडून आली तरी आनंद. आमच्या महायुती मधील कोणीतरी बहीण नगराध्यक्ष पदावर बसेल...आपले विचार चांगले असले पाहिजेत.. या चांगल्या विचाराने मी निवडणुकीला उभी राहिली असून गुहागर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी येथील जनता मला नक्कीच बहुमताने निवडून देतील असा विश्वासही असल्याचे शेवटी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg