loader
Breaking News
Breaking News
Foto

बहिरवली व लोटे पंचायत समिती गणातून दोन अपक्ष उमेदवारांची माघार

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील बहिरवली आणि लोटे पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या दोन अपक्ष उमेदवारांनीन आपली उमेदवारी माघार घेतल्याची माहिती खेड तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. लोटे पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार नितीन श्रीराम कडू, तर बहिरवली पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार शहनवाज इकबाल सुर्वे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. ही माघार शनिवार, २४ जानेवारी रोजी घेण्यात आली असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोटे पंचायत समिती गणात सुरुवातीला एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या सर्व उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत वैध ठरले होते. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह चार अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. मात्र अपक्ष उमेदवार नितीन श्रीराम कडू यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता लोटे गणात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या सहावर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे बहिरवली पंचायत समिती गणातून एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षांचे अधिकृत उमेदवार तसेच पाच अपक्ष उमेदवारांचा समावेश होता.

टाइम्स स्पेशल

या सर्व नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. मात्र अपक्ष उमेदवार शहनवाज इकबाल सुर्वे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता बहिरवली गणात आठ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, दोन अपक्ष उमेदवारांच्या माघारीमुळे दोन्ही पंचायत समिती गणातील निवडणूक समीकरणे काही प्रमाणात बदलली असून, येत्या काळात प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या माघारीची अधिकृत माहिती खेड तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माध्यमांना दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg