loader
Breaking News
Breaking News
Foto

कास वाघबिळकर मंदिराजवळ बिबट्याचा साळींदरावर हल्ला

बांदा (प्रतिनिधी) - कास गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कास वाघबिळकर मंदिराजवळ बिबट्याने साळींदरावर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात साळींदर जखमी झाला असून जवळपास एक तास बिबट्या आणि साळींदर यांच्यात झटापट सुरू होती, असे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले. काल रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास संदेश भाईप, यश भाईप, योगेश भाईप व सुभाष भाईप हे बांद्याहून कास येथे घरी परतत असताना त्यांना ही झटापट दिसून आली. त्यांनी तत्काळ वनविभागाच्या कर्मचार्‍यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. मात्र प्रत्यक्ष उपस्थित कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर ग्रामस्थांनी जाब विचारल्यानंतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुतळी बॉम्ब फोडून बिबट्याला पळवण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून कास गावात बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थ सांगत असून, यापूर्वी सुभाष भाईप यांच्या घराजवळून बिबट्याने बोकड पळवून नेला होता. मात्र पुरावा नसल्याचे कारण देत वनविभागाने पंचनामा केला नव्हता, त्यामुळे भाईप यांचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असे नुकसानग्रस्तनी सांगितले. आता वनविभागाने तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg