loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खात्यांची जबाबदारी, मात्र NCP कडील अर्थ खातं गेलं

मुंबई. : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळा पार पडला. लोकभवनात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. दरम्यान आता सुनेत्रा पवार यांना अजित पवारांकडील अर्थ खातं मिळणार का, त्यांना कोणती खाती मिळणार याच्या चर्चा सुरू होत्या. आता त्यांना तीन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे असणारी सर्व खाती सुनेत्रा पवार यांना मिळतील अशा चर्चा सुरू होती. पण, अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते ते खाते सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही वेळातच सुनेत्रा पवार यांचे खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. अजित पवार यांच्याकडील अर्थ खातं वगळून अन्य खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ खात्याची धुरा देण्यात आली आहे. अर्थ व नियोजन खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. त्यामुळे राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प आता देवेंद्र फडणवीस मांडणार हे स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळावं यासाठी अजित पवार अडून बसले होते. सत्ता स्थापनेवेळी नगरविकास मंत्रालय शिंदे सेनेला तर अर्थखातं हे राष्ट्रवादीला देण्यात आलं होतं. तर भाजपकडे महसूल आणि गृह ठेवण्यात आलं होतं. मात्र आता अर्थ खातं राष्ट्रवादीकडून गेल्याने त्यांच्याकडे आता एकही मोठं खातं नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg