loader
Breaking News
Breaking News
Foto

रमजाननिमित्त दाभोळ रंगीबेरंगी रोषणाईने सजले; तीन दशकांतील सर्वात कमी उपवास कालावधी

दाभोळ (वार्ताहर) : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना यंदा १९ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून संपूर्ण दाभोळ शहरात आनंद, उत्साह आणि भक्तीमय वातावरण आहे. विशेष म्हणजे यंदाचा रमजान छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाला. दोन्ही सण शांतता, बंधुभाव आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरे करण्यात आले, ज्यामुळे सामाजिक सलोख्याचा सुंदर संदेश देण्यात आला. हिजरी (AH) पंचांग हे पूर्णपणे चंद्र कालगणनेवर आधारित असल्यामुळे ते सौर कालगणनेपेक्षा दरवर्षी सुमारे ११ दिवसांनी पुढे सरकते. त्यामुळे रमजान महिना वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येतो. साधारणपणे दर ३3 वर्षांनी चंद्र व सौर कालगणना जुळते. यंदाचा रमजान हा गेल्या तीन दशकांतील तुलनेने कमी उपवास कालावधी असलेला मानला जात आहे. हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आणि उन्हाळ्याच्या प्रारंभी येत असल्याने उपवासाचे तास तुलनेने कमी आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदा रमजानच्या दुसऱ्या रोजापासूनच एसएससी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. तरीदेखील शिक्षण आणि उपवास यांचा समतोल राखत विद्यार्थी मोठ्या श्रद्धेने रोजा पाळत आहेत. थंडी असो, उष्णता असो किंवा परीक्षेचा ताण — कोणतीही अडचण मुस्लिम बांधवांना रोजा ठेवण्यापासून परावृत्त करू शकत नाही. रमजान हा संयम, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा महिना असल्याने सर्वजण उत्साहाने आणि निष्ठेने उपवास पाळत आहेत. दाभोळमधील सर्व मशिदी रंगीबेरंगी रोषणाईने सजविण्यात आल्या असून दररोज सायंकाळी इफ्तारनंतर ‘तरावीह’ नमाज मोठ्या भक्तिभावाने अदा केली जात आहे. रात्री सुमारे १०.३० वाजेपर्यंत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मशिदींमध्ये उपस्थित राहून नमाज अदा करीत आहेत

टाइम्स स्पेशल

लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या पवित्र महिन्यात सहभागी होत असून दाभोळमध्ये सर्वत्र शांतता, बंधुभाव आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवास येत आहे. तसेच दाभोळमध्ये प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरासमोर एलईडी ट्यूबलाईट लावण्यात आल्या असून संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर हिंदू बांधवांचा शिमगा सणही आजपासून साजरा होत असून उद्यापासून पालखी भक्तांच्या भेटीला जाणार आहे. विविध सणांच्या निमित्ताने दाभोळमध्ये सामाजिक एकात्मतेचे आणि सौहार्दाचे सुंदर चित्र पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg