loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ कथा लेखक काशिनाथ माटल यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान!

मुंबई : फलटण येथील ऍग्रो न्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मुंबईचे ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांना "सावट"या उत्कृष्ट कथासंग्रह लेखना बद्दल काल मराठी भाषादिनी "धर्मवीर छत्रपती महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार-२०२६",देऊन गौरविण्यात आले.पुण्याच्या चपराक प्रकाशनने अत्यंत सुबकतेने प्रकाशित केलेल्या, मानव संहारक "सावट"या कथासंग्रहाचा दिल्लीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशन सोहळा पार पडला होता,त्या वेळेपासूनच हे पुस्तक सर्वत्र बहुचर्चित ठरले होते. फलटण नवलबाई मंगल कार्यालयात पार पडलेल्या संमेलनाचे उद्घाटक मठपती पं.पू. तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी केले. स्वागताध्यक्ष श्रीमंत अनिकेत राजे निंबाळकर होते,संमेलनाध्यक्ष प्रा.विजय काकडे होते.ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे,अशोक मेहता,चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण पार पडले. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र,शाल,श्रीफळ आणि मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी कादंबरी, चरित्रग्रंथ,प्रवास वर्णन,कविता,गझल, साहित्य आणि उत्कृष्ट दिवाळी अंकांना साहित्य सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कथकार प्रा.विजय काकडे म्हणाले, पुस्तकांना उत्कृष्ट साहित्य सेवा पुरस्कार देताना,दर्जेदार साहित्य म्हणूनच निवड करण्यात आली आहे. कथालेखक काशिनाथ माटल यांची अनुबंध,एक क्षण, खेळ मांडीयेला नवा, बेवारस आणि सावट अशी एकूण पाचही कथासंग्रह वाचकप्रिय ठरले आहेत. या यशाबद्दल राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg