loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा-कुवे संघटन पुरस्कृत अपक्ष उमेदवार पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

लांजा (संजय साळवी) : लांजा - कुवे संघटन पुरस्कृत अपक्ष उमेदवार पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज गावातील प्रमुख मानकर्‍यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रियांका संजय यादव यांच्या हस्ते फित कापून झाले. लांजा नगरपंचायत निवडणुकीत लांजा - कुवे संघटनच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासह एकूण १३ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रियांका संजय यादव या लांजा - कुवे संघटनच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत. सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर गुरुवारी त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी लांजा गावातील प्रमुख मानकरी, प्रतिष्ठित नागरिक, पॅनलचे सर्व उमेदवार तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg