loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब खेड सिटीचा शिगवण कुटुंबीयांना मदतीचा हात

खेड (प्रतिनिधी) - खेड लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने निराधारांना आधार, या सामाजिक उपक्रमांतर्गत वेरळ-उगवतवाडी येथील कै. प्रवीण प्रकाश शिगवण यांच्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. कै. प्रवीण शिगवण यांचे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिगवण कुटुंबीयांवर ओढवलेल्या आर्थिक समस्येचा विचार करून लायन्स क्लबने कुटुंबीयांला मदतीचा हात पुढे केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ला. विवेक कदम यांच्या माध्यमातून ही मदत उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. रोहन विचारे यांनी शिगवण कुटुंबीयांना धीर देत, लायन्स कुटुंबातील एका सदस्यावर आलेला प्रसंग समजून आम्ही तुमच्या दुःखात सहभागी झालो आहोत. या दुःखद प्रसंगी लायन्स क्लब सदैव तुमच्या पाठीशी राहील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी क्लबचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी, सचिव ला. उत्तम कांबळे, माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकणे, ला. विवेक कदम यांच्यासह शिगवण कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg