loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने शानदार करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

खेड (प्रतिनिधी) - कोकण एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने, JMBR Academy Konkan Khed आणि जमाअतुल मुस्लिमीन म्हसळा यांच्या सहकार्याने शानदार करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास 2000 विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. म्हसळा तसेच आसपासच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने लोक या कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुबश्शिर जमादार यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगताना कोकण एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशनचे चेअरमन डॉ. सुफियान काझी यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचा उद्देश कोकणातील तरुणांना NEET, JEE आणि इतर स्पर्धा व नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य मार्गदर्शन देणे हा आहे. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्ती एकाच ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे. कार्यक्रमात JMBR Academyच्या तज्ज्ञांनी विविध स्पर्धा परीक्षांची माहिती, त्यांची तयारी कशी करावी, उपलब्ध शैक्षणिक संधी आणि अकादमीच्या उद्दिष्टांबद्दल मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी JMBR Academyचे चेअरमन जनाब बशीर हजवानी यांनी कोकणातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना सांगितले, “तुम्ही मेहनत करा, आम्ही तुम्हाला पुढे जाण्यासाठी पूर्ण सहकार्य करू.” कार्यक्रमाला जवळपास 2000 विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन मिळाले. आयोजकांनी भविष्यातही कोकणातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg