रत्नागिरी : शहरातील भगवती बंदर परिसरातील पठाणवाडी येथे नागरिकांच्या मागणीनुसार एस.टी. प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने या निवारा शेडची उभारणी करण्यात आली आहे. पठाणवाडी परिसरात एस.टी. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी भाजपा शहर उपाध्यक्ष आशिष मोरे यांच्याकडे निवारा शेड उभारण्याची मागणी केली होती.
नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आशिष मोरे यांनी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या सहकार्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने निवारा शेड उभारून दिला. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निवारा शेडचे उद्घाटन स्थानिक ज्येष्ठ रहिवाशांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, शहर उपाध्यक्ष आशिष मोरे, नगरसेविका सुप्रिया रसाळ, नगरसेवक राजू तोडणकर, नगरसेवक नितीन जाधव, सायली बेर्डे, नितीन गांगण, शैलेश बेर्डे, डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवारा शेड उपलब्ध झाल्याने पठाणवाडी परिसरातील एस.टी. प्रवाशांना पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात बसची प्रतीक्षा करताना सुरक्षित आणि सोयीस्कर आसरा मिळणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.



















































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.