loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी एमआयडीसीत गांजा विक्रीचा प्रयत्न उधळला; ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील जेके फाईल भागात गांजा विक्रीच्या उद्देशाने आलेल्या एका संशयिताला डीबी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७८.५ ग्रॅम गांजा आणि गांजा विक्रीसाठी वापरण्यात येणारी दुचाकी असा एकूण ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डीबी पथकाला एक इसम अमली पदार्थ गांजा विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने जेके फाईल, एमआयडीसी परिसरात सापळा रचला. संशयित व्यक्ती तेथे आल्यानंतर दोन पंचांसमक्ष त्याची झडती घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

झडतीदरम्यान त्याच्याकडे ९ हजार रुपये किमतीचा १७८.५ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच गांजा विक्रीसाठी वापरण्यात येणारी TVS Ntorq 125 दुचाकी, अंदाजे ५५ हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. या प्रकरणी सूरज परशुराम नंदिवले (वय २४, सध्या रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी, रत्नागिरी; मूळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सपोफौ/७०८ दीपक साळवी, पोहेकॉ/२५१ शांताराम झोरे, पोहेकॉ/५३८ दिनेश आखाडे, पोहेकॉ/७५४ भालचंद्र मयेकर, पोकॉ/४८४ अमित पालवे आणि पोकॉ/७८ निलेश शिंगवे सहभागी होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg