loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या हेदली ग्राममंदिरात भजनाचा जंगी सामना

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - प्रति वर्षाप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील हेदली येथील ग्राम मंदिरात देव दिवाळी सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्या शनिवार दि.२९ नोव्हें. रोजी सकाळी श्री सत्यनारायणाची महापुजा, महाआरती, महाप्रसादाचे आयोजन असून रात्री भजनाचा जंगी सामना ठेवण्यात आला आहे. रात्री ११ वाजता श्री सिद्धी विनायक प्रा. भजन मंडळ बापर्डे, गुरुवर्ये, अजित गोसावी यांचे शिष्य, बुवा संदेश नाईक धुरे यांना पकवाज साथ मिळणार आहे. शेखरं घाडी विरुद्ध हनुमान प्रा. भजन मंडळ नारकरवाडी पाचल (राजापूर) येथील गुरुवर्ये संतोष शिरसेकर यांचे शिष्य बुवा तेजस अनिल नारकर यांना पकवाज वादनाची साथ मिळणार आहे ती विवेक पांचाल आणि प्रसिद्ध तबला वादक विकास देवळेकर, वरील दोन्ही बुवा जिल्ह्यातील प्रसिद्ध नामांकित भजनी बुवा म्हणून ओळखले जातात. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादासाठी उपस्थित राहावे. तसेच या भजनाचा आस्वाद घेण्यासाठी तालुक्यातील जास्तीतजास्त भजनप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री नवलाई ग्राममंडळ हेदली यांनी सर्व ग्रामस्थांच्यावतीने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg