पनवेल :- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची भाजपच्या अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आल्याने पनवेलसह रायगड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या विविध प्रकोष्ठांची पुनर्रचना करण्यात आली असून, त्याअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर अभियंता प्रकोष्ठाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अभियंता, तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच व्यावसायिकांना पक्षाच्या विचारांशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी करण्याच्या दृष्टीने या प्रकोष्ठाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघासह रायगड जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. संघटनात्मक कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि विकासकामांचा व्यापक अनुभव असल्यामुळे त्यांना प्रदेश चिटणीस आणि आता अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी जबाबदारी सोपविण्यात आली. राज्यातील अभियंता व तांत्रिक क्षेत्रातील विविध घटकांना भाजपच्या संघटनात्मक प्रवाहात सहभागी करून घेत, त्यांच्या माध्यमातून विकासाभिमुख विचारांना चालना देण्याचे काम अभियंता प्रकोष्ठाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रकोष्ठाचे राज्यातील कार्य अधिक प्रभावी आणि व्यापक होणार असून या नियुक्तीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच अभियंता क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.







































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.