loader
Breaking News
Breaking News
Foto

पावस जि. प.गटाचे सदस्य, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रचे रत्नागिरी विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी तालुक्यातील पावस जिल्हा परिषद गटाचे सदस्य, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रचे रत्नागिरी विभागाचे जिल्हा अध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या होती.रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जावकर प्लाझा, जयस्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, E-Wing, पहिला मजला, गाळा नं. १ व २, रत्नागिरी येथे जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शेकडो शुभचिंतकांची उपस्थिती होती. पालकमंत्री नाम. उदय सामंत यांना तातडीच्या कामानिमित्त चाकण येथे जावे लागल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली. त्यांच्या अनुपस्थितीत हा उद्घाटन सोहळा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे तसेच पंचायत समिती सदस्य नेताजी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सचिव केदार चव्हाण, रत्नागिरी तालुका अध्यक्ष मंदार नैकर, लांजा तालुका अध्यक्ष योगेश पांचाळ, सचिन गोताड, साहिल गोरे, दीपक सांबरे, बंटी महाकाळ, कैलास आडवीरकर, राज फुटक, मंदार मांडवकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास उर्फ बंधू वारीशे, पावस जि.प.गट उपविभाग प्रमुख प्रवीण शिंदे, पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, पावस विभाग समन्वयक अजय तेंडुलकर, निलेश गजने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शुभचिंतक मोठ्या संख्येने हजर होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी ॲड. महेंद्र मांडवकर यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यालयात जनतेच्या प्रश्नांसाठी ॲड. महेंद्र मांडवकर यांच्यासोबत आम्ही देखील खांद्याला खांदा लावून काम करू"असे आश्वासन यावेळी मान्यवरांनी दिले.

टाईम्स स्पेशल

या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांना शासकीय योजनांचे फॉर्म भरणे, जाती, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलेअर दाखल्यांसाठी अर्ज करणे, अर्जांचा पाठपुरावा करणे आणि जिजाऊ संस्थेच्या शैक्षणिक व आरोग्य उपक्रमांचे मार्गदर्शन या सर्व सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत. खेड्यापाड्यातून येणाऱ्या सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात होणारा त्रास कमी व्हावा, हाच या कार्यालयामागील मुख्य उद्देश असल्याचे ॲड. महेंद्र मांडवकर यांनी यावेळी सांगितले. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर ९४२३२९२५७५ यावर संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg