loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप युवा मोर्चा मध्य तालुका सरचिटणीसपदी अथर्व सावंत यांची नियुक्ती

देवळे (प्रकाश चाळके) - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या मध्य तालुका सरचिटणीसपदी अथर्व प्रशांत सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अथर्व सावंत हे भाजपाच्या रत्नागिरी नाचणे विभागातून सक्रियपणे काम करत होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, रत्नागिरी दक्षिण भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राहुल पवार आणि मध्य भाजपयुमो तालुकाध्यक्ष साहिल साळवी, तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व सावंत काम करणार आहेत.

टाईम्स स्पेशल

“पक्षाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मध्य तालुक्यात भाजयुमोची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करेन,” अशी प्रतिक्रिया अथर्व सावंत यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg