loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे कोंडगे गावच्या वतीने सन्मानित

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष, निष्कलंक आणि आदर्श सेवा बजावणारे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे आणी हवालदार आशिष शेलार यांना भारत सरकार गृह मंत्रालय यांच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन २०२६ च्या औचित्याने अतीउत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल लांजा तालुक्यातील कोंडगे गावच्या वतीने निर्मल ग्राम पंचायत कोंडगेचे सरपंच, डॉ. एस. व्हि. कदम, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नील विश्वनाथ जाधव आणि ग्राम सुरक्षा समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय मुरलीधर कदम यांनी निळकंठ बगळे आणि शेलार यांचा शाल, छ. शिवराय यांचा ग्रंथ भेट आणि पुषगुच्छ देऊन सन्मानित करणेत आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा पोलीस स्थानकात झालेल्या या छोटेखाणी कार्यक्रमाप्रसंगी गावाच्यावतीने सन्मानित करणेत आल्याने निळकंठ बगळे यांनी कोंडगे गावाचे आभार व्यक्त करून कोंडगे गावातील कोणत्या समस्या येतील त्यासाठी आमच्याकडून नेहमीच सहकार्य करण्याची आमची भूमिका राहील असे सांगितले. तसेच गावातील अवैध दारू धंदे बंद करण्यासाठी ज्यांनी सतत मेहनत घेऊन कारवाई केली, असे पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले यांचाही यावेळी शाल, छत्रपती शिवराय यांचा ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg