loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआरची जोरदार धडक; तिघे जखमी

खेड (दिलीप देवळेकर) - खेडमध्ये मुंबई-रत्नागिरी मार्गावर मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरणे नाका येथील वारकरी मठासमोर गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआर कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका पुरुषासह दोन महिला जखमी झाल्या असून, त्यातील एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पेन येथून गणेशमूर्ती घेऊन साखरपा परिसराच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की वॅगनआरची दिशा बदलून ती मुंबईच्या दिशेने वळली, तर टेम्पो काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात टेम्पोमधून नेण्यात येत असलेल्या गणेशमूर्तींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वॅगनआरमधून रोहन बाळकृष्ण बाळसराफ, सोनल चव्हाण आणि कोमल शिर्के हे प्रवास करत होते. हे तिघेही बदलापूरहून गणपतीपुळे येथे जात होते. अपघातानंतर तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg