loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम वेल्फेअर सोसायटीतर्फे उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - इस्लाम धर्मियांचे पवित्र पैगम हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त (ईद-ए-मिलाद-उन-नबी) दापोली बाजार पेठेतील 'मुस्लिम वेल्फेअर सोसायटी' च्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दापोली उपजिल्हा रुग्णालयातील सर्व आंतररुग्णांना (पेशंट्सना) भेट देऊन त्यांना फळांचे वाटप करण्यात आले.​

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामाजिक सलोखा आणि मानवी आरोग्याचा संदेश ​ईद-ए-मिलादचा सण हा आनंद, शांतता, आणि परोपकाराचा संदेश देतो. याच विचारांना अनुसरून मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची आत्मीयतेने विचारपूस केली. आजारपणात रुग्णांना मानसिक आधार मिळावा आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांना फळांचे वाटप करत लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

​या सामाजिक उपक्रमाबद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर व सर्व कर्मचारी वर्गाने मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या या संवेदनशील विचाराचे आणि कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. सणासुदीच्या दिवशी रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा हा उपक्रम दापोली शहरात कौतुकाचा विषय ठरला. ​या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी दापोलीचे पदाधिकारी, बाजार पेठेतील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वांच्या संयुक्त सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg