loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी बस स्थानकावर महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची मागणी

सावंतवाडी : सावंतवाडी एसटी बस स्थानकावर महिलांना सुरक्षितता महत्त्वाची आहे त्यामुळे भेट दिली असता विद्यार्थी आणि महिलांनी माहिती दिली. एसटी बस बाबत तक्रारी तसेच छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे नगराध्यक्ष श्रध्दा सावंत भोसले यांनी सांगितले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानावर हकिगत घालणार आहे. शहरातील एसटी बस स्थानकामध्ये एका युवतीची काल सायंकाळी छेड काढल्या प्रकरणी सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी नगरसेविका आणि नगरसेवकांसह एसटी बस स्थानकाला भेट देऊन सायंकाळी उशिराने प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलींसह महिलांची विचारपूस केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान अशा प्रकारे मुलींची छेड काढणे चुकीचे असून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच सावंतवाडी एसटी बस स्थानकामध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल नियुक्त कराव्या. तसेच सीसीटीव्ही सुरू करावेत, अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान त्यांनी सुरू असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सावंतवाडी एसटी बस स्थानकातील वेंगुर्ला येथे सुटणाऱ्या मिनी बस स्थानकामध्ये चिखलाचे साम्राज्य तसेच अंधाराचे साम्राज्य पसरले असून सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचे निदर्शनास आले दरम्यान या बस स्थानकाच्या शेडमध्ये दारू पिऊन काही मंडळी झोपल्याचेही त्यांनी यावेळी सुरक्षा रक्षकाचे निदर्शनास आणून दिले. सुरक्षारक्षक डी एस पारधी हे त्यांच्या समवेत होते. त्याचबरोबर नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उपसभापती सुनिता पेडणेकर, नगरसेविका नीलम नाईक यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होत्या.

टाईम्स स्पेशल

दरम्यान नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी एसटी बस स्थानकाच्या प्रमुख गौतमी कुबडे यांच्याशी संवाद साधला. दरम्यान नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांच्या समोर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वेंगुर्ले बस स्थानक मधून वेंगुर्ला मठ मार्गे जाणाऱ्या एसटी बस मधून आकेरी व अन्य स्टॉप वर एसटी बस थांबणार नाही अशा प्रकारची उद्धट वर्तणूक करून निघून गेले त्यामुळे शाळकरी मुलीसुद्धा बस स्थानकामध्ये थांबून राहिल्याची घटना घडली आहे, याबद्दल तीव्र नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg