रत्नागिरी: जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात आता नवा आणि महत्त्वाचा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे रत्नागिरीच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळाली आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसीचा दर्जा 'क' वर्गातून 'ड प्लस' वर्गात समाविष्ट करण्यात आला आहे. या बदलामुळे येथील उद्योजकांना गडचिरोलीसारख्या मागास व विशेष औद्योगिक क्षेत्रांना मिळणाऱ्या सवलती आणि सुविधांचा मोठा लाभ मिळत आहे. परिणामी, बँक कर्जे मिळणे तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय सुविधा आता येथील उद्योजकांना अत्यंत सहजतेने आणि विनाव्यत्यय उपलब्ध होत आहेत.
मंत्री ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नांमुळे रत्नागिरीत एकापाठोपाठ एक मोठे प्रकल्प प्रत्यक्षात येत आहेत. लोटे परशुराम परिसरासह जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये नव्या उद्योगांची भर पडली आहे. लोटे येथील नवीन एमआयडीसीमध्ये फिशिंग कंपन्यांसह तब्बल पाच नवीन कंपन्यांचे कामकाज सुरू झाले आहे, तर किल्ली कंपनीच्या पाण्याचे प्रोडक्शनसुद्धा लोटे येथे यशस्वीरीत्या सुरू झाले आहे. याशिवाय, अडाळी येथे तब्बल चार हजार कोटी रुपयांचा महाकाय सोलार प्रकल्प सुरू झाला असून यामुळे या भागातील ऊर्जा व औद्योगिक क्षेत्र मजबूत होणार आहे. जिल्ह्यात सुरू झालेल्या या नवीन प्रकल्पांमुळे स्थानिक स्तरावर उत्पादनाला मोठी चालना मिळाली आहे. कोकाकोला कंपनीचा प्रकल्प प्रत्यक्षात येऊन येथील कारखान्यातून शीतपेयांचे उत्पादन सुरू झाले आहे. या प्रकल्पातून दररोज चाळीस टनांचे तीस ट्रक भरून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत, ज्यामुळे वाहतूक आणि व्यावसायिक उलाढाल वाढली आहे.
यासोबतच, जिल्ह्यात दीडशे कोटी रुपयांचा महत्त्वाचा ऑइल प्रोजेक्ट सुरू झाला आहे; ज्याचा दुसरा युनिट तेलंगणातील हैदराबाद येथे कार्यरत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रत्नागिरीची औद्योगिक ओळख अधिक ठळक होत आहे. केवळ कारखानेच नव्हे, तर जलवाहतूक आणि उत्पादन क्षेत्रालाही मोठी दिशा मिळाली आहे. रत्नागिरीतील भारती सीपीयार्ड कंपनीचे काम यशस्वीरीत्या सुरू झाले असून, येथील कारखान्यात तयार झालेली पहिली संपूर्ण शिप (जहाज) पाण्यावर तरंगत दिमाखात रवाना झाली आहे. या सर्व प्रकल्पांमुळे कोकणातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असून, रत्नागिरी जिल्हा राज्याचा एक प्रमुख आणि सक्षम औद्योगिक हब म्हणून झपाट्याने पुढे येत आहे.




















































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.