loader
Breaking News
Breaking News
Foto

माजगाव येथे कुत्र्यांच्या तावडीतून सांबराला वाचवले; सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदकर यांची प्रसंगावधानता

​सावंतवाडी, (प्रतिनिधी): माजगाव येथे मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या एका सांबराला सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदकर यांच्या प्रसंगावधानतेमुळे जीवदान मिळाले. ​माजगाव दत्त मंदिर आणि मेटवाडा परिसरात ७ ते ८ मोकाट कुत्र्यांनी एका सांबराचा पाठलाग करून त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे सांबार अत्यंत भयभीत झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा प्रकार निदर्शनास येताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांना पळवून लावले आणि सांबाराचा जीव वाचवला. ​त्यानंतर खंदकर यांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सांबराला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त केले. ​जयेश खंदकर यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि प्राणीदयेबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg