loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरेगाव ग्राम विकास मंडळाचा गुणगौरव सोहळा संपन्न

मुंबई (प्रतिनिधी) : कोरेगाव ग्राम विकास मंडळ, मुंबई तर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी वनिता विकास हायस्कूल, घाटकोपर येथे कोरेगावातील मुंबईस्थित दहावी, बारावी, पदवीधर व डिप्लोमा धारक गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा मुख्याध्यापिका दीपा गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत शालोपयोगी भेटवस्तू देऊन संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षण हा आपल्या प्रगतीचा प्रमुख मार्ग आहे. आजच्या युगात अनेक प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत ज्या योगे आर्थिक उन्नती सोपी होते.विद्यार्थ्यांनी केवळ पदवीधर होण्या पेक्षा व्यावसायिक शिक्षण घ्यावं.आजच युग हे एआयचं युग आहे त्यामुळे स्पर्धा खूप आहे हे समजून घेऊन मेहनत घ्या.सामाजिक जबाबदारीची जाण ठेवा असा सल्ला देऊन गावातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहोत अशा शुभेच्छा दीपा गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिल्या.

टाईम्स स्पेशल

या प्रसंगी प्रा. संदीप मोरे, मंडळाचे माजी अध्यक्ष विजय मोरे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मोरे आदींनीही मार्गदर्शन केले. प्रकाश दत्ताराम चौगुले यांनी गुणगौरव सोहळा करीता विशेष देणगी दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कार्याध्यक्ष संजय वामन मोरे यांनी केले तर उद्योजक बळीराम मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg