loader
Breaking News
Breaking News
Foto

चंद्रनगर शाळेत मोफत साहित्य वाटपासह ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; समाजसेवक प्रकाश मिसाळ यांचे कौतुकास्पद काम

दापोली (प्रतिनिधी) : चंद्रनगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्यासह छत्र्यांचे वाटप करत ग्रामस्थ सेवा मंडळ चंदनगर मुंबईचे अध्यक्ष समाजसेवक प्रकाश मिसाळ यांनी आपले सामाजिक बांधिलकीचे दायित्व जपले आहे. दापोली शहराला लागूनच असलेल्या आणि तालुक्यातील एक महत्वाच्या असलेल्या चंद्रनगर या गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना चंद्रनगर ग्रामस्थ सेवा मंडळ मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि समाजसेवक प्रकाश मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले शिवाय गावातील जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत अजूनही जे आपली गुरेढोरे राखून या वयातही आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. अशांना प्रेमाच्या आपुलकीची भेट म्हणून त्यांच्या प्रत्यक्षत्यात घरी जाऊन आर्थिक मदतीसह छत्री वाटप करून आपल्या सामाजिक बांधिलकीच्या दायित्वाची भूमिका जपण्याचे महत्त्वपुर्ण काम केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चंद्रनगर येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्यासह भेटवस्तू वाटपाच्या कार्यक्रमासाठी चंद्रनगर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल मुलुख, मुख्याध्यापक मनोज वेदक, मानसी सावंत, रेखा ढमके, विनोद शिगवण, महेश सुरती आदी मान्यवरांसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रनगर ग्रामस्थ सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्यासह भेटवस्तू प्रदान करण्याच्या राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे चंद्रनगरसह परिसरात मिसाळ यांच्या दातृत्वाच्या सामाजिक बांधिलकीच्या कामाचे समाधान व्यक्त केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg