loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी संत गाडगे बाबा यांच्या ग्रामगीताच्या आधारे गाडगे बाबांचे 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' कीर्तन याद्वारे सामाजिक कार्याचा संक्षेपाने परीचय करून दिला. उपस्थित प्राध्यापकवृंद व विद्यार्थी यांना संत गाडगे बाबा यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, डॉ. प्रसाद भागवत, प्रा. लंकेश गजभिये, डॉ. दिनेश पारखे, ग्रंथपाल धनंजय गुरव, ग्रंथालय परिचर परशुराम चव्हाण, संदिप चव्हाण व महाविद्यालयातील विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर व श्रोते यांचे आभार डॉ. प्रवीण सनये यांनी मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg