loader
Breaking News
Breaking News
Foto

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत दि मॉडेल इंग्लिश स्कूलच्या चैतन्य शेट्येची दमदार कामगिरी

रत्नागिरी (जमीर खलफे): नागपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत चैतन्य अभिजित शेट्ये याने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ही स्पर्धा दि. २१ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सेंट मेरी स्कूल कॅम्पस, मानकापूर येथे आयोजित करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागपूर येथे सहभागी झालेल्या रत्नागिरी संघामध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या चैतन्य शेटये (व्हाईस कॅप्टन) तर अनय शेटये - ओपनर बॅट्समॅन आणि कवी संसारे - यष्टीरक्षक यांचा सहभाग होता. स्पर्धेदरम्यान चैतन्यच्या संघाने बीड, बुलढाणा, अमरावती शहर आणि जळगाव जिल्हा संघांवर विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत नागपूर संघाविरुद्ध मात्र संघाला पराभव स्वीकारावा लागला. अनयने तीन बॉल मध्ये दहा रन व एक ओव्हर मध्ये दोन विकेट घेत खळबळ उडवून दिली. कवीने एसटी मागे सुद्धा खूप चपळाईने यष्टीरक्षण करत दोन कॅच व तीन रन आउट करून आपले कौशल्य दाखवून दिले.

टाईम्स स्पेशल

चैतन्य शेट्ये याने एका सामन्यात अवघ्या १२ चेंडूंमध्ये २४ धावा करत आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवले. तसेच गोलंदाज म्हणूनही प्रभावी कामगिरी करत ४ गडी बाद केले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीची दखल घेत त्याला ‘सामनावीर’ (Man of the Match) पुरस्काराने गौरविण्यात आले. चैतन्य, अनय व कवी यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे शाळा संस्था व आजी माजी विद्यार्थ्यांनी पालक वर्गातून कौतुक होत असून, त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg