loader
Breaking News
Breaking News
Foto

या देशात अच्छे दिन चोरांना आलेत - आम. भास्करशेठ जाधव

आबलोली (संदेश कदम) - या देशात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात पूर्णपणे अस्थिरतेचे वातावरण आहे माणसा माणसातील विश्वास संपतो की काय? अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. या देशात महिला - मुली सुरक्षित नाहीत. अयोध्येत राम मंदिर व्हाव म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी मदत केलेली आहे. सगळ्या पक्ष प्रातांच्या लोकांनी मदत केलेली आहे. प्रत्येकाची भावना एकच होती मी अयोध्येमध्ये जाऊ शकत नाही पण माझ्या देणगीतून माझ्या सेवेतून कुठेना कुठेतरी प्रभू रामचंद्राची सेवा झाली तर पुढच्या सात पिढ्या माझ्या पोरा - बाळांचे भले होईल, या विश्वासाने सर्व जाती - धर्मांच्या लोकांनी मदत केली. आणि प्रभू रामचंद्राचे मंदिर उभे राहिले. पण त्या मंदिरातील देणगीवर ट्रस्टीच्या लोकांनी डल्ला मारला १४ कोटी रुपये चोरी केली त्यामुळे या देशात अच्छे दिन चोरांना आलेत, अशी सडकून टीका शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठेतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आबलोली येथे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात १४ कोटी लूटमारी विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या वतीने रामरक्षा महाआरती जल्लोषात संपन्न झाली. यावेळी जमलेल्या जनसमुदयाला शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव मार्गदर्शन करताना बोलत होते. आमदार भास्करशेठ जाधव पुढे म्हणाले की, यांनी आमचे आमदार चोरले, खासदार चोरले, पक्ष चोरला, एवढेच काय पण मी जाहीरपणे सांगतोय अयोध्येत राम मंदीर व्हावं म्हणून ज्या काँग्रेसला हे जातीयवादी - जातीयवादी म्हणतं होते, मुसलमानांचे रखवाले म्हणून हिनवत होते. त्या काँग्रेसवाल्यांनी सुद्धा पैसे गोळा करुन दिले. हिंदूनी पैसे दिलेच. पण बौद्ध समाजाच्या लोकांनी पण पैसे दिलेले आहेत. सर्व समाजाने पैसे, दाग-दागिने दिलेले आहेत. कुणी दिलेले नाहीत अशातला भाग नाही. पण विश्वासघात झाला आहे. ज्या ट्रस्टिंकडे विश्वासाने एवढी मोठी संपत्ती दिली त्या लोकांनी सोनं-नाणं, चांदी आणि पैसे हे सर्व भाजपाच्या, विश्व हिंदू परिषदेच्या, आर.एस.एस.च्या, बजरंग दलाच्या ताब्यात दिले. पण हे पक्के चोर निघाले. असा आरोप करुन आमदार भास्करशेठ जाधव पुढे म्हणाले की, या चोरी बद्दल सरकार मधील कोणीही ब्र काढत नाही की या चोरीची जबाबदारी घेत नाही. या देशात अच्छे दिन हे चोरांना आलेत असा आरोपही आमदार भास्करशेठ यांनी केला आहे.

टाईम्स स्पेशल

यावेळी विचारपीठावर शिवसेना नेते आणि आमदार भास्करशेठ जाधव, जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत, विनायक मुळ्ये, माजी सभापती पूर्वीताई निमुणकर, युवकांचे तालुका अध्यक्ष निनांद नार्वेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य रवी आंबेकर, स्थानिक महिला मंडळाच्या अध्यक्षा अस्मिताताई रेपाळ, उपतालुका प्रमुख काशिनाथ मोहिते, रमेश नेटके (माऊली), तालुका सचिव विलास गुरव, शरद साळवी, जगदीश गडदे, सागर डिंगणकर, नरेश निमुणकर, तृशांत सुर्वे, प्रथमेश निमुणकर, कृष्णा उकार्डे, महेश दिंडे, प्रवीण भंडारी, अजित रेपाळ, महेश रेडेकर, शिवाजी गुरसळे, रवींद्र रेपाळ, प्रमोद भंडारी, संतोष पालशेतकर आदी. शिवसैनिक महिला - पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित रेपाळ यांनी केले

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg