loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड आगारातील बससेवा सुधारण्यासाठी देवा ग्रुप फाउंडेशनचे आमरण उपोषण

मुरुड-जंजिरा : मुरुड आगारातील बससेवा नियमित, सुरक्षित व सक्षम व्हावी तसेच मुरुड तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सार्वजनिक वाहतूक समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी देवा ग्रुप फाउंडेशन, मुरुड-जंजिरा यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. हे आमरण उपोषण शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता सुरू करण्यात येणार असून, उपोषणकर्ते डॉ. अनिकेत प्रदीप मेस्त्री, कोकण विभाग अध्यक्ष देवा ग्रुप फाउंडेशन हे उपोषणास बसणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रमुख मागण्या - मुरुड—पनवेल बससेवा नियमित सुरू करावी, मुरुड-रोहा बससेवा रोहा रेल्वेच्या वेळापत्रकानुसार उपलब्ध करावी, मुरुड—पुणे ताम्हाणे मार्गे बससेवा सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, मुरुड आगारातून पूर्वीप्रमाणे बाजारपेठेतून जाणार्‍या बसफेर्‍या सुरू ठेवाव्यात, ग्रामीण भाग, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरेशा बसफेर्‍या उपलब्ध कराव्यात, बंद व नादुरुस्त बसगाड्यांची तातडीने दुरुस्ती करून नियमित मेंटेनन्स करावे, प्रत्येक बस रस्त्यावर सोडण्यापूर्वी पूर्ण तांत्रिक व यांत्रिक तपासणी करावी, चालक, वाहक, मेकॅनिक व तांत्रिक कर्मचार्‍यांची कमतरता दूर करावी, प्रवाशांना मध्येच उतरवणे, दादागिरी अथवा गैरवर्तन करणे तात्काळ बंद करावे; विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेची काटेकोर काळजी घ्यावी, बसगाड्यांची नियमित स्वच्छता करावी, चालकांच्या केबिनमध्ये गुटखा, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, बस रस्त्यात बंद पडल्यास प्रवाशांसाठी तात्काळ पर्यायी बसची व्यवस्था करावी, डेपो व कंट्रोल केबिनमध्ये २४ तास संपर्क क्रमांक उपलब्ध करून तो प्रत्येक बसमध्ये व डेपोच्या फलकावर नमूद करावा, २४ तास कार्यरत स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप तक्रार क्रमांक सुरू करून प्रत्येक तक्रारीची २४ तासांत चौकशी करावी व तक्रारदाराला कार्यवाहीची माहिती द्यावी, वरिष्ठ अधिकार्‍यांनी मुरुड आगाराची प्रत्यक्ष पाहणी करून बस, कर्मचारी, मेंटेनन्स व प्रवासी सुविधांचा आढावा घ्यावा, मुरुड आगाराला आवश्यक त्या प्रमाणात सुस्थितीतील/नवीन बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेला डिझेल पंप तातडीने सुरू करण्याची कार्यवाही करावी, सी.एन.जी. बससेवा उपलब्ध असल्यास प्रवाशांसाठी अलिबाग डेपोमध्ये सुसज्ज आसनव्यवस्था उपलब्ध करावी. मुरुड तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित बाब आहे. त्यामुळे या न्याय्य मागण्यांच्या लढ्यात मुरुड तालुक्यातील नागरिक, प्रवासी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन देवा ग्रुप फाउंडेशन, मुरुड-जंजिरा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg